मसाल्यांचा जादूई वापर व खास रेसिपीज

घरच्या स्वयंपाकात हॉटेल व पंगतीसारखी खमंग तररी आणि चव आणण्यासाठी सासुरवाडी मसाल्यांच्या सिद्ध पाककृती.

Kala Masala Shev Bhaji
⏱️ २५ मिनिटे 👥 ४ व्यक्ती 🌶️ झणझणीत

काळ्या मसाल्याची खान्देशी शेवभाजी

कांदा-खोबरे भाजून वाटण तयार करा. फोडणीत आले-लसूण पेस्ट आणि १.५ चमचा सासुरवाडी काळा मसाला परता. पाणी उकळवून वरून जाड गाठी शेव टाका. अस्सल हॉटेल स्टाईल तररी तयार!

वापरा: काळा मसाला हा मसाला पहा →
Kolhapuri Tambda Rassa
⏱️ ४० मिनिटे 👥 ५ व्यक्ती 🌶️ गावरान चव

अस्सल कोल्हापुरी तांबडा रस्सा

मटण हळद-मिठात शिजवून अळणी पाणी वेगळे करा. तेलात कांदा, तमालपत्र व २ मोठे चमचे सासुरवाडी मटण मसाला परतून अळणी पाणी टाका. मंद आचेवर उकळी आणा — अप्रतिम तांबडा रस्सा तयार!

वापरा: मटण मसाला 🚀 लवकरच येत आहे
Maharashtrian Goda Masala Amti
⏱️ २० मिनिटे 👥 ४ व्यक्ती 🌿 सौम्य व सुगंधी

पारंपरिक गोडसर वरण व आमटी

तुरीची डाळ मऊ शिजवून घ्या. फोडणीत मोहरी, हिंग, कढीपत्ता, थोडे आले, गूळ, चिंचेचा कोळ आणि १ चमचा सासुरवाडी गोडा मसाला टाका. जेवणाची चव थेट आज्जीच्या हातची आठवण करून देईल.

वापरा: गोडा मसाला 🚀 लवकरच येत आहे
Desi Chicken Sukka
⏱️ ३५ मिनिटे 👥 ४ व्यक्ती 🌶️ झणझणीत सुक्का

गावरान चिकन सुक्का

चिकन तुकडे मॅरिनेट करा. कढईत भरपूर कांदा आणि सुके खोबरे लालसर भाजून घ्या. त्यात २ चमचे सासुरवाडी चिकन मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परता. भाकरी किंवा चपातीसोबत स्वर्गसुख!

वापरा: चिकन मसाला 🚀 लवकरच येत आहे
Shahi Masala Pulao
⏱️ २५ मिनिटे 👥 ५ व्यक्ती 🌸 शाही सुगंध

शाही व्हेज बिर्याणी व पुलाव

बासमती तांदूळ व भाज्या तुपात परतून घ्या. शिजताना शेवटी वरून फक्त अर्धा चमचा सासुरवाडी शाही गरम मसाला आणि कोथिंबीर शिंपडा. दम देऊन वाफ काढा — अख्खा परिसर सुगंधाने दरवळेल!

वापरा: गरम मसाला 🚀 लवकरच येत आहे
Kolhapuri Misal Tarri
⏱️ ३० मिनिटे 👥 ६ व्यक्ती 🔥 कडक झणझणीत

सासुरवाडी स्पेशल मिसळ कट / तररी

मोड आलेली मटकी उकडून घ्या. तेलात भरपूर लसूण, कांदा खोबऱ्याचे वाटण आणि १.५ चमचा सासुरवाडी तिखट मसाला टाका. वरून लाल तररीचा जाड तवंग येईल. फरसाण व पावासोबत खायला तयार!

वापरा: तिखट मसाला 🚀 लवकरच येत आहे
ऑर्डर करा